
सॅमसंगसारख्या भारतीय बाजारात आघाडीवर असलेल्या कंपनीला काही वर्षांपूर्वी बाजारात आलेल्या मायक्रोमॅक्स, एमआय, विवो, ओप्पो यांसारख्या कंपन्यांनी काहीसे मागे टाकले होते. पण सॅसमंग मोबाईल बाजारात आपले स्थान टिकवण्यासाठी मागच्या काही दिवसांत विविध ऑफर्स जाहीर करत आहे. कंपनीने नुकतीच आपली एक ऑफर जाहीर केली असून त्यानुसार, ९ हजारांहून अधिक किंमतीची कॅशबॅक ऑफर सॅमसंग गॅलेक्सी S9 आणि गॅलेक्सी S9 प्लसवर जाहीर केली आहे.
सॅसमंगच्या ‘या’ फोनवर ९ हजारांची कॅशबॅक
आयसीआयसीआयच्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्ही हे दोन्ही फोन खरेदी केल्यास तुम्हाला हा फायदा मिळू शकणार आहे. फेब्रुवारी महिन्यात आपले दोन्ही फोन कंपनीने लाँच केले होते. ही ऑफर या दोन्ही फोनवर देण्यात आली आहे. ही ऑफर १ मे ते ३० जून अशा दोन महिन्यांच्या कालावधीत उपलब्ध असून तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ती नक्कीच फायदेशीर ठरेल.
