पतंजलीने तात्पुरते बंद केले किंभो अॅप


मुंबई : योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने व्हॉट्सअॅपलाही पर्याय उपलब्ध करून दिला होता. पण जास्त काळ हा पर्याय टिकला नाही. हे अॅप त्यांना मागे घ्यावे लागले आहे. व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून पतंजलीने ‘किंभो’ नावाचे अॅप मार्केटमध्ये आणले होते. हे अॅप गुरूवारपासून युजर्सना वापरता येणार होते पण याच्या अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या. हे अॅप सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वापरण्याजोगे नसल्याचे युजर्सचे म्हणणे होते. काही त्रुटी या अॅपमध्ये नव्हत्या पण आम्ही प्रायोगिक तत्वावर हे लॉंच केले होते असे पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.

‘किंभो’ अॅपमधील त्रुटी दुर करुन लवकरच हे अॅप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सध्या तरी या अॅपमधील डेटा सुरक्षीत राहत नव्हता असे युजर्सचे म्हणणे आहे. गुरूवारी हे अॅप प्ले स्टोअरवर आल्यानंतर मोठ्या संख्येने हे डाऊनलोडही करण्यात आले होते.

Leave a Comment