एअरटेल देत आहे १ रुपया ९७ पैशांमध्ये १ जीबी डेटा


आपल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी भारती एअरटेलने डेटा लिमिट वाढवले असून या प्लॅनमध्ये आतापर्यंत कंपनीकडून प्रत्येक दिवशी १.४ जीबी डेटा ग्राहकाला मिळत होता. पण कंपनीने आता या प्लॅनमध्ये बदल करुन डेटा लिमिट वाढवले आहे.

आपल्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये एअरटेल प्रत्येक दिवशी आता २.४ जीबी डेटा देणार आहे. आतापर्यंतची एअरटेलची ही ऑफर सर्वात स्वस्त ऑफऱ असल्याचेही म्हटले जात आहे. एअरटेलच्या ग्राहकाला आता अवघ्या १ रुपया ९७ पैशांमध्ये १ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना आतापर्यंत ७० दिवस किंवा ८४ दिवस व्हॅलिडिटी मिळत होती. ८४ दिवसांची व्हॅलिडिटी ज्या ग्राहकांना मिळते केवळ त्याच ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. कारण त्याच ग्राहकांसाठी डेटा लिमिट २.४ जीबी वाढवण्यात आले आहे.

Leave a Comment