जिओ फोनवर अशी सेट करा मोफत कॉलर ट्यून


रिलायन्स जिओतर्फे आपल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग, इंटरनेट डेटा सारख्या सुविधा देण्यात येत आहेत. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे पण यात अशीही एक सुविधा दिली जात आहे जी पहिल्यापासून अगदी मोफत आहे. पण फारच कमी युजर्सला या सेवेसंदर्भात माहिती आहे.

जिओ ट्युन व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिस असून युजर्स ज्याच्या मदतीने आपल्याला आवडते गाणे कॉलर ट्युन सेट करु शकता. कॉलिंग ट्युन सेट केल्यानंतर तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तिला गाणे किंवा म्युझिक ऐकायला मिळेल. जिओ ट्युन सेट करण्यासाठी तुमच्या गुगल प्ले किंवा अॅप स्टोअरमधून जिओ म्युझिक डाऊनलोड करावे लागेल. अॅपमध्ये ब्राऊज करुन तुम्ही आवडती जिओट्युन सेट करु शकता.

अॅपच्या माध्यमातून कॉलर ट्युन सेट करण्यासाठी गाण्यांचे कॅटेगरी पेज उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स असलेल्या ड्रॉप डाऊन मेन्यूवर क्लिक करा. या ठिकाणी ‘Set As JioTune’ या पर्यायाला निवडा. यासोबतच तुम्ही प्लेयर मोडमधील कुठल्याही गाण्याला ‘Set As JioTune’ बटनावर क्लिक करुन अॅक्टिव्हेट करु शकता.

Loading RSS Feed

Leave a Comment