बाजारात दाखल होणार हिंदुस्थान युनीलीव्हरचे दक्षिण आशियाई ब्रेकफास्ट पदार्थ


मुंबई – देशातील एक मोठी उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जाणारी हिंदुस्तान युनिलिव्हर आपले पारंपरिक दक्षिण आशियायी ब्रेकफास्टचे पदार्थ बाजारात दाखल करणार आहे. कंपनीने आधीच्या नूडन्स, सूप यांसारख्या पदार्थांमध्ये बदल करत खिचडी, पोंगल, उपमा अशा पौष्टीक पदार्थांचा समावेश करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने या नव्या उत्पादनांमध्ये आयुष या आपल्या आयुर्वेदीक ब्रॅंडप्रमाणे ज्वारी आणि बाजरीच्या भरडीचा उपयोग केला आहे. सध्या भारतीय बाजारात ग्राहक पाश्चिमात्य पदार्थांकडून पारंपरिक भारतीय पदार्थ किंवा पौष्टीक पदार्थांना पसंती देत आहेत.

नव्याने आलेली उत्पादने खरेदी करण्याआधी ग्राहकांनी या उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे मुख्य कारण वेगळे असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पतंजलीसारख्या दलिया, कॉर्नफ्लेक्स, ओट्स यांसारख्या पदार्थांशी स्पर्धा करणे हा कंपनीचा मूळ हेतू आहे. भारतात अशापद्धतीचे पदार्थ पदार्थ जास्त काळ टिकावेत यासाठी पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांमुळे कमी प्रमाणात खरेदी केले जातात. आयुर्वेदातून आलेल्या पदार्थांच्या रेसिपींना पुढे आणणे आणि भारतीय लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करणार आहे. कंपनीने यासाठी अन्नपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला असून त्याचे लोकशाहीकरण येत्या काळात केले जाईल असे कंपनीच्या कार्यकारी संचालक गितू वर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment