इंग्रजाने जीर्णोद्धार केलेले एकमेव शिवमंदिर


मध्यप्रदेशातील आगर मालवा येथील वैजनाथ महादेव मंदिर एका आगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट आहे ते म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार एका ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. देशातील बहुदा हे एकमेवच मंदिर आहे जेथे एका इंग्लिश महिलेने नवस बोलला आणि तिच्या प्रार्थनेला ओ देऊन भगवान शिवाने दूरवर असलेल्या तिच्या पतीला दर्शन देऊन त्याचा जीव वाचविला.

या मंदिराबाबत भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे कि जो कुणी मनापासून या महादेवाची प्रार्थना करून सच्च्या मनाने काही मागेल तर त्याची ती इच्छा पूर्ण होते. बाणगंगा नदीकाठी असलेल्या या मंदिराचा संबंध राजा नल याच्याशी आहे. या मंदिराची उंची ५० फुट आहे आणि त्यावर ४ फुट उंचीचा सोन्याचा कळस आहे. गर्भगृहात मोठे शिवलिंग आहे. मागे कमळकुंज आहे. पृवी हा मठ होता आणि तेथे तांत्रिक पूजा केल्या जात असेही सांगतात.

या मंदिराची कथा अशी की ब्रिटीश कर्नल मार्टिन हा अफगाण युद्धावर गेला होता तेव्हा त्याची पत्नी मालवा येथे होती. युधाभूमिवरून कर्नल पत्नीला त्याची खुशाली पत्राने कळवीत असे. मात्र एक वेळ अशी आली कि त्याची कोणतीच खुशाली पत्नीला समजली नाही आणि त्याचे काही बरेवाईट झाले असावे या काळजीने ती रस्त्यातून जात असताना या मंदिरातून मंत्रोच्चार आणि शंख ध्वनी तिच्या कानावर आला. त्याक्षणी तिने आत जाऊन तिची काळजी पुजारयाच्या कानावर घातली तेव्हा पुजाऱ्याने तिला लघुरुद्र करण्यचा सल्ला दिला. तिनेही तो मानला आणि लाघुरूढ करून शिवाकडे नवरा सुखरूप येउदे, मंदिराचा जीर्णोद्धार करेन असा नवस केला.

थोडेच दिवसात खरोखर पतीची खुशाली तिला कळलीच पण कर्नल युद्धावरून परत आला तेव्हा त्याने सांगितले कि वाघाचे कातडे पांघरलेल्या आणि हातात त्रिशूल असलेल्या एका योग्याने अफगाण्यांच्या तावडीतून त्याचा जीव वाचविला आणि तुझ्या बायकोच्या सेवाभावामुळे तुझा जीव वाचविण्यास आलो असे सांगितले. यावर तिला ओळख पटली आणि तिने मंदिराची कथा त्याला सांगितली. नंतर खरोखरच त्यांनी बोलल्याप्रमाणे मंदिराचा जीर्णोद्धार केला. या संदर्भातला एक शिलालेख मंदिरात आहे.

Leave a Comment