
मुंबई : आपल्या प्रीडेड ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने नवीन शानदार ऑफर आणली आहे. जिओच्या ग्राहकांना ‘हॉलिडे हंगामा ऑफर’नुसार ३९९ रुपयांऐवजी आता केवळ २९९ रुपये मोजावे लागतील. तसेच १०० रुपये तात्काळ सूट मिळणार आहे. पण तुम्हाला त्यासाठी माय जिओ अॅपवरुन रिचार्ज करावे लागेल. तुम्हाला ‘फोन पे’च्या माध्यमातून पैसे द्यावे लागतील. आज १ जून ते १५ जून २०१८ पर्यंत या नव्या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
जिओचा ३९९ रुपयांचा प्लान झाला २९९ रुपयांचा
२०१६ला लॉन्च केल्यानंतर जिओने एकापेक्षा एक ऑफर ग्राहकांसाठी आणल्या. कंपनीने सध्या वाढती स्पर्धा लक्षात घेऊन १०० रुपये कॅशबॅक देण्याचे जाहीर केल्यामुळे तुम्हाला ३९९ रुपयांऐवजी २९९ रुपये मोजावे लागतील. तसेच इंस्टंट कॅशबॅक ऑफर दोन भागात मिळणार आहे. पहिली प्रीपेड ग्राहकांसाठी ५० रुपयांचे व्हाऊचर मिळेल. जिओ अॅपच्या माध्यमातून जे रिचार्ज करतील.
जिओ अॅपवरील फोन पे या माध्यमातून पेमेंट करतील त्यांच्यासाठी दुसरी ऑफर आहे. ५० रुपये कॅशबॅक त्यांना मिळेल. ग्राहकांसाठी जिओचे ३९९ रुपयांचे रिचार्ज ८४ दिवसांसाठी असेल आणि दिवसाला १.५ जीबी डाटा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला ८४ दिवसांसाठी १२६ जीबी डाटा मिळेल. तसेच अनलिमिटेड व्हाइस कॉलसोबत १०० एसएमएस प्रतिदिवस करता येणार आहे.
