आता एलपीजी गॅसच्या किमतीचा भडका


नवी दिल्ली – सर्वसामान्य जनता आधीच वाढत्या पेट्रोल किमतीमुळे त्रस्त असतानाच आता एलपीजी गॅसच्या किमतीत मुंबईसह देशातील ४ महानगरात वाढ करण्यात आली आहे. अनुदानित एलपीजी गॅसची मुंबईमध्ये किंमत ४८१.८४ रुपये तर विना-अनुदानित गॅसची किंमत ६७१.५० रुपये झाली आहे.

अनुदानित गॅस राजधानी दिल्लीत २.३४ रुपयांनी तर विना-अनुदानित गॅस ४८ रुपयांनी वाढला आहे. दिल्लीत विना-अनुदानित गॅसची किंमत ६९८.५० रुपये आणि अनुदानित गॅसची किंमत ४९३.५५ रुपये आहे. कोलकात्यामध्ये विना- अनुदानित गॅसची किंमत ७२३.५० आणि अनुदानित गॅसची किंमत ४९६.६५ रुपये आहे. तर चेन्नईमध्ये विना-अनुदानित आणि अनुदानित गॅसच्या किंमती अनुक्रमे ७१२.५० आणि ४८१.८४ रुपये आहेत.

Leave a Comment