स्लीपिंग लायन मोत्याला लिलावात विक्रमी किंमत


जगातील सर्वात मोठा स्वच्छ पाण्यातील आणि आकाराने अनोखा असलेल्या मोत्याला लिलावात विक्रमी किंमत मिळाली असून हा मोती ३,२०,००० युरोला विकला गेला आहे. या मोत्याच्या संबंध १८ व्या शतकाशी असून एकेकाळी तो रशियाची राणी कॅथरीन द ग्रेटच्या मालकीचा होता.

या मोत्याला एक विशिष्ट आकार असून तो झोपलेल्या सिंहासारखा दिसतो. हा मोती चीनी सागर अथवा पर्ल नदीमध्ये मिळाला असावा असा अंदाज आहे. त्याचे वजन १२० ग्राम असून लांबी २.५ इंच आहे. जगात प्रसिद्ध असे जे तीन मोती आहेत त्यातील हा एक आहे. लिलावात एका जपानी व्यावसायिकाने तो खरेदी केला. १९६५ मध्ये युनायटेड इस्ट इंडीज कंपनीतील एका डच व्यापारयाने तो जकार्ता मधून आणला होता व त्यानंतर तो कंपनीचा अकौंटंट हेंड्रिक सँडर्स कडे होता. १७७८ मध्ये त्याच्या निधनानात्र टो प्रथम लिलावात विकला गेला होता. त्यानंतर तो रशियन राणीकडे होता.

Leave a Comment