पेट्रोल, डिझेलच्या दरात तब्बल १६ दिवसानंतर घट


नवी दिल्ली – बुधवारी सतत १६ दिवसांपासून वाढत असलेल्या पेट्रोलच्या किमतीत अल्प घट झाली असून पेट्रोलच्या किमतीत दिल्लीत ६० पैशांनी व मुंबईत ५९ पैशांनी घट झाली आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ५६ पैशांनी व मुंबईत ५९ पैशांनी कमी झाली आहे. इंधनाच्या सततच्या मागील काही दिवसांपासून दरवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसलेली आहे. या दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे.

Leave a Comment