रेडमीचे हे फोन ९९९ रुपयात खरेदी करण्याची संधी


मुंबई : भारतीय बाजारात यावर्षी शाओमीने लाँच केलेल्या रेडमी नोट ५ आणि नोट ५ प्रोला तुफान प्रतिसाद मिळत आहे. हे फोन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना या फोनसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली आहे. फ्लिपकार्टने फोन खरेदी करण्यासाठी मोठी ऑफर दिली असल्यामुळे यापैकी कोणताही एक फोन ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.

अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटही दोन्ही फोनवर दिला जात आहे. तर एक्स्चेंज ऑफरमध्ये अकरा हजार रुपयांपर्यंतची सूट आहे. रेडमी नोट ५ चे दोन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये ६४जीबी आणि ३२ जीबी व्हेरिएंटचा समावेश आहे. यांची किंमत अनुक्रमे ११ हजार ९९९ रुपये आणि ९ हजार ९९९ रुपये आहे. एक्स्चेंज ऑफरअंतर्गत ११ हजार ९९९ रुपये किंमत असणाऱ्या फोनवर अकरा हजार रुपयांपर्यंत सूट आहे, ज्यामुळे हा फोन केवळ ९९९ रुपयात मिळेल.

९ हजार ९९९ रुपये किंमतीच्या या ३२ जीबी फोनवर नऊ हजार रुपयांपर्यंत सूट असल्यामुळे हा फोन केवळ ९९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकतो. एक्स्चेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुमचा जुना फोनही चांगला असणे गरजेचे आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड युझर्ससाठी पाच टक्के अतिरिक्त डिस्काऊंट मिळत आहे. तर ईएमआयची सुरुवात ५८२ रुपये प्रति महिना आहे.

२२०० रुपयांचा कॅशबॅक रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मिळत आहे. कॅशबॅक ५० रुपये आणि ४४ रुपयांच्या व्हाऊचर्समध्ये मिळेल. १९८ आणि २९९ रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केल्यास कॅशबॅक थेट युझर्सच्या माय जिओ अकाऊंटमध्ये जमा होईल, ज्यानंतर रिचार्जच्या माध्यमातून कॅशबॅक वापरता येईल.

Leave a Comment