टेलिकॉम सेक्टरमध्ये रामदेव बाबांचा प्रवेश; लाँच केले स्वदेशी समृद्धी सिम कार्ड


नवी दिल्ली – आता टेलिकॉम सेक्टरमध्ये योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रवेश केला असून नुकतेच रामदेव बाबांनी एक सिम कार्ड लाँच केले आहे. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ असे नाव त्याला देण्यात आले आहे. हे कार्ड भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे लाँच केले आहे. हे कार्ड सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल. यामध्ये १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर यूजरला २जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. त्यासोबतच या सिम द्वारे पतंजलीची उत्पादने मागवल्यास १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.

फक्त १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच २जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे. सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी हे सिम लाँच केले आहे, पण जेव्हा हे सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाईल तेव्हा या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर १०% सूट दिली जाणार आहे. या सिमच्या यूजरला २.५ लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि ५ लाख रुपयापर्यंतचे लाइफ लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.

Leave a Comment