१२५ वर्षे जुन्या जीन्सची तब्बल ६८ लाख रुपयांमध्ये विक्री


वॉशिंग्टन – आजच्या तरुणाईचा ‘जीन्स’ ही एक अविभाज्य भाग बनली असून कपड्यांमध्ये कित्येक काळापासून विविध फॅशनचे प्रकार आले आणि गेले, पण जीन्सचे महत्त्व किंचितही कमी झालेले नाही. १२५ वर्षे जुनी जीन्सची जोडी नुकतीच विकण्यात आली आहे.

आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? आणि तुम्ही असे देखील म्हणाल कि एवढी जुनी जीन्स घालणार कोण? पण तुम्हाला विश्वास नाही बसणार एवढ्या किंमतीत ही जीन्सची जोडी विकली गेली आहे. ही जोडी तब्बल १ लाख डॉलर्समध्ये विकल्या गेली. म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे ६८ लाख रुपयांमध्ये ही जीन्स खरेदी करण्यात आली. डेनिम जीन्सची निर्मिती करणारी लेवाईस कंपनी आहे. या जीन्सची निर्मिती याच प्रसिद्ध कंपनीने केली असून या दोन्ही जीन्स निळ्या रंगाच्या आहेत.

या जीन्सवर एका लिलावात बोली लावण्यात आली असून जीन्सची जोडी खरेदी करणारी व्यक्ती ही दक्षिणपूर्व आशियातील रहिवासी आहे. दोन्ही जीन्सचे लिलावात खरे विक्री मूल्य आणि खरेदीदाराचे नाव उघडकीस करण्यात आलेले नाही. या जीन्सच्या फॅब्रिकची निर्मिती न्यू हॅम्पशायरमधील एका मिलमध्ये करण्यात आली होती. तर या जीन्सला सॅन फ्रांसिसको येथे बनविण्यात आले. या जीन्स सन १८९३ मध्ये सोलोमन वार्नर यांनी विकत घेतल्या होत्या. ही जीन्सची जोडी अनेक दशकांपासून पेटीत बंद होती. ही जीन्स वार्नर यांनी काही मोजक्याच प्रसंगी परिधान केली होती.

Leave a Comment