ऑडीच्या काही मॉडेल्सवर तब्बल १० लाख रूपयांपर्यंतची सूट


नवी दिल्ली : जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने आपल्या काही कार वर तब्बल १० लाख रूपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा केली आहे.

आपल्या A3, A4, A6 आणि Q3 मॉडल्‍स वर ऑडी कंपनीने २.५ लाख ते ९.७ लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या सोबतच हफ्त्यांवर कार खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठीही चांगली ऑफर लॉन्च केली आहे. तुम्ही आपली फेव्हरेट कार २०१८ मध्ये खरेदी केली तर पुढील वर्षापासून तुमच्या कारचा ईएमआय सुरु होणार आहे. पण ही ऑफर ठराविक कालावधीसाठी असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

ऑडी A3 कारची किंमत या ऑफरमुळे २७.९ लाख रुपये झाली आहे. त्याच प्रमाणे ऑडी A4 ची किंमत ३५.९९ लाख रुपये तर ऑडी A6 ची किंमत ४६.९९ लाख रुपये आणि ऑडी Q3 च्या मॉडल्सची किंमत ३१.९९ लाख रुपये झाली आहे. देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या दरम्यान आता ऑडी कंपनीने आपल्या कारच्या किमतीत मोठी कपात केली आहे.

Leave a Comment