वारंवार वस्तू बदलणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉन करणार बॅन


नवी दिल्ली : आपल्या नव्या पॉलिसीवर काम करणे सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या अॅमेझॉनने सुरु केले आहे. अॅमेझॉन सोबतच इतरही ई-कॉमर्स वेबसाईट्सने काही दिवसांपूर्वी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक दमदार ऑफर्स सादर केल्या होत्या. अॅमेझॉनने यामध्ये रिटर्न पॉलिसी सुरु केली होती, कंपनी यामध्ये सामानाची डिलिव्हरी झाल्यावर ३० दिवसांत सामान पुन्हा परत घेत होती.

पण आता अॅमेझॉनने दिलेल्या सुविधेनंतर सामान परत करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळेच अॅमेझॉनने आता नवी पॉलिसी बनवली आहे. कंपनीतर्फे या पॉलिसीनुसार बहुतांश वेळा वस्तू परत करणाऱ्या ग्राहकांवर लाईफ-टाईम बॅन लावण्यात येत आहे. कुठल्याही सूचनेशिवाय अॅमेझॉनतर्फे ही कारवाई करण्यात येत आहे.

याबाबत वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी अॅमेझॉन ग्राहकांना ई-मेल मिळाला ज्यामध्ये म्हटले आहे की, नियोजित करण्यात आलेल्या संख्येपेक्षा तुम्ही अधिक वेळा वस्तू परत केल्याने तुमच्यावर बंदी घालण्यात येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, १० टक्के प्रोडक्ट परत करणाऱ्या ग्राहकांवर बंदी घालण्यात येत आहे. या संदर्भात स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Leave a Comment