डीजी लॉकर अॅपवर उपलब्ध होणार गाडीची कागदपत्र


मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्स किंवा गाडीची कागदपत्र गाडी चालवताना सोबत नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा दंड भरावा लागतो. पण आता यापुढे त्याची आवश्यकता भासणार नाही. ही सगळी कागदपत्रे मोबाईलवरच्या डीजी लॉकर या अॅपवर उपलब्ध असणार आहेत. २००६ नंतरची लायसन्स आणि आरसी अॅपमध्ये पहिल्या टप्प्यात उपलब्ध असतील. त्यापूर्वीची लायसन्स आणि आरसी स्कॅन करून डिजिटल सहीसह अॅपवर अपलोड करता येणार आहेत. त्यांची मागणी वाहतूक पोलिसांनी केल्यावर त्यांना अॅपवरुन डिजिटल डॉक्युमेंट्स दाखवता येणार आहेत. त्या कागदपत्रांची क्यू आर कोड च्या माध्यमातून पडताळणी करता येणार आहे.

या अॅपवर सध्या देशातील २४ कोटी वाहने आणि ४० कोटी लायसन्सचा डेटा उपलब्ध असून प्ले स्टोअरवर डीजी लॉकर हे अॅप उपलब्ध असून ते डाऊनलोड केल्यानंतर आधार क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करता येते. त्यानंतर युजर नेम आणि पासवर्डच्या माध्यमातून या अॅपचा वापर करता येतो. https://digilocker.gov.in या वेबसाईटवर याविषयीची संपूर्ण माहिती उपलब्ध आहेत. डिजिटल तसेच पेपरलेस कामकाजाच्या दृष्टिकोनातून टाकण्यात आलेले हे पाऊल अतिशय महत्वाचे असे म्हणता येईल.

Leave a Comment