पेट्रोल-डिझेल आता भरा; पैसे ३० दिवसात द्या


मुंबई : वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमधून दिलासा म्हणून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी आता हिंदूस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेल उधार देणार असून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी लोन उपलब्ध करून देणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्टने या ऑफरसाठी हिंदूस्तान पेट्रोलियमसोबत करार केला आहे. सध्या व्यावसायिक वापरासाठीची वाहने आणि टायर खरेदी करण्यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट लोन देते. पण पेट्रोल-डिझेलसाठीही आता लोन देण्यात येणार आहे. ओटीपीवर आधारित ही लोन सुविधा असणार आहे. ३० दिवसांमध्ये हे लोन फेडावे लागणार आहे.

कंपनीने ही ऑफर कॅशलेस इकोनॉमी आणि डिजीटल इंडिया मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी लोन घ्यायचे असल्यास ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपीच्या मार्फत लोन देण्यात येईल. लोनवरचे पेट्रोल-डिझेल वापरल्यामुळे ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट आणि विम्याची सुविधाही मिळणार असल्याचे हिंदूस्तान पेट्रोलियमने सांगितले आहे.

Leave a Comment