पृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजुचा शोध घेण्यासाठी चीनची शोध मोहीम


बीजिंग – चीनने एका उपग्रहाचे पृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजुचा शोध घेण्यासाठी व तेथे संपर्क निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रक्षेपण केले असून क्युक्यीयो म्हणजे मॅगपी ब्रिज असे या उपग्रहाचे नाव आहे. लाँग मार्च-४सी या रॉकेटच्या साह्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण चीनच्या शीचँग सॅटेलाईट लाँच सेंटर येथून करण्यात आले. चायना नॅशनल स्पेस अॅडमिनेस्ट्रेश (सीएएसए) ने ही माहिती दिली आहे.

मॅनेजर झीहँग लिहुवा या उपक्रमाची अधिक माहिती देताना म्हणाले, चीनचा चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या भागाचे संशोधन करणाऱ्या देशाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक असण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. या उपग्रहाला रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर २५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत सोडण्यास यश आले. पृथ्वीपासून २०० किमीवर सोडण्यात आलेल्या या उपग्रहाचा एकुण प्रवास ४००,००० किमीचा असणार आहे. त्यानंतर सौरऊर्जेवर चालणारा आणि संपर्क स्थापित करण्यात महत्वची भूमिका बजावणार अँटिना उघण्यात येणार आहे.

चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हॅलो ऑरबिटमध्ये म्हणजे ४५५,००० किमावरच्या सेकंड लॅगरॅनजिन (एल२) मध्ये क्युक्यीयो उपग्रह पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा जगातील चंद्राच्या दुसऱ्या बाजुकडे पोहोचणारा पहिला कम्युनिकेशन सॅटेलाईट असणार आहे. या मोहिमेत खुपच आव्हाने आहेत. तसेच त्या कक्षेत स्थापण करण्यास त्याला खुपच जुळवाजुळवी करावी लागणार असल्याचे झीहँग यांनी म्हटले.

Leave a Comment