जयपूरमधील उद्योगपतीने फॅन्सी नंबर प्लेटसाठी मोजले ‘एवढे’ पैसे


जयपूर: फॅन्सी नंबर प्लेटसाठी जयपूरमधील एका उद्योगपतीने तब्बल १६ लाख रुपये मोजले आहेत. आपल्या जॅग्वार एक्सजे एलसाठी १ क्रमांक असलेली नंबर प्लेट उद्योगपती राहुल तनेजा यांनी विकत घेतली आहे.

यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, २५ मे रोजी राहुल यांनी नवी कार खरेदी केली. या गाडीसाठी त्यांना १ क्रमांकाची नंबर प्लेट हवी होती. संपूर्ण राज्यातून या क्रमांकासाठी अनेकांनी बोली लावली होती. यापैकी राहुल यांनी यासाठी सर्वाधिक बोली लावली होती. दीड कोटी रुपयांना राहुल यांनी जॅग्वार खरेदी केली होती. त्यांनी एक क्रमाकांच्या नंबर प्लेटसाठी एक ते दीड महिना वाट पाहिली. एक हा राहुल यांचा लकी क्रमांक असून कायमच मला नंबर १ राहायला आवडत, असल्याचे राहुल यांनी सांगितले.

Leave a Comment