पहिला थ्रीडी डिस्प्लेचा हायड्रोजन वन स्मार्टफोन


मुव्ही शुटींग साठी आणि फोर के व्हिडीओ साठी उत्तम प्रतीचे कॅमेरे बनविणाऱ्या रेड कंपनीने आता एक अनोखा स्मार्टफोन हायड्रोजन वन नावाने आणला आहे. हा फोन कोणत्याही व्हिडीओ अथवा दृश्याचे थ्री डी होलोग्राफिक मोड मध्ये डिस्प्ले रेकोर्ड करू शकतो. युएसए टुडे डॉट कॉमवर या स्मार्टफोनची माहिती दिली गेली आहे. त्यानुसार १ ऑगस्ट २०१८ ला हा फोन लाँच होणार असून त्याचे प्रीबुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर सुरु झाले आहे. या प्रकारचा हा जगातला पहिलाच थ्री डी डिस्प्लेचा स्मार्टफोन आहे.

या स्मार्टफोनने रेकॉर्ड केलेले व्हिडीओ युजरला शानदार थ्रीडी मुव्ही पहिल्याची मजा देऊ शकतील असा दावा केला जात आहे. हा फोन अँड्राईड ओएसला सपोर्ट करतो आणि त्याला ५.७ इंची स्क्रीन दिला गेला आहे. हा फोन कोणत्याही डीएसएलआर किंवा एचडी व्हिडीओ कॅमेरयाच्या पुढचा फ्युचर फोन आहे असा दावा कंपनीने केला आहे.

या फोनला दोन फ्रंट कॅमेरे आहेत. त्यामुळे सेल्फी आणि व्हिडीओ अधिक देखणे येतात. त्याचबरोबर पॉवरफुल स्टीरीओ स्पीकर मुळे गाणी ऐकणे आणि व्हिडीओ पाहण्याची मजा अनेकपटीने वाढते. हा फोन खास मुव्ही मेकर्स आणि क्रिएटीव्ह युजरसाठी असल्याचे सांगितले आज आहे. या फोनच्या किमती १२०० डॉलर म्हणजे ८४००० रु.पासून सुरु होत आहेत.

Leave a Comment