न्यूड पेंटिंगला मिळाली १० अब्ज ६० कोटीची किंमत


सुमारे १०० वर्षे जुन्या एका न्यूड पेंटिंगला न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात १० अब्ज ६० कोटींची किंमत मिळाली असून हे पेंटिंग जगभरातील अनेक चित्रप्रदर्शनात यापूर्वी मांडले गेले होते.

इटालियन चित्रकार एमेडीयो मोदीग्लीयानि याने हे पेंटिंग १९१७ साली रेखाटले होते. यात एक स्त्री पाठमोरी नग्नावस्थेत चितारली गेली आहे. एमेडीयोचे सर्वात मोठे न्यूड पेंटिंग मानले जाते. त्याला पेंटिंगची आवड होती आणि त्याने या केलेला नवी दिशा दिल्याचे मानले जाते. अवघ्या ३५ व्या वर्षी त्याचे निधन झाले. जगातील प्रत्येक मोठ्या संग्रहालयात त्याची पेंटिंग आहेत. त्याचे आणखी एक न्यूड पेंटिंग यापूर्वी १७०.४ दश लक्ष डॉलरला विकले गेले आहे.

Leave a Comment