रेल्वेतील खाद्यपदार्थांवर आता १८ टक्के जीएसटी


नवी दिल्ली – रेल्वेत प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खान-पानासाठी आता जास्त जीएसटी भरावा लागणार आहे. प्रवासादरम्यान रेल्वे डब्यात विकल्या जाणाऱ्या खाद्य-पेयांवर यापुढे १८ टक्के जीएसटी (वस्तू व सेवा कर) लावला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीच्या अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने(एएआर) घेतला आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत या खाद्य-पेयांवर सवलतीच्या दरात ५ टक्के जीएसटी लावण्यात येत होता.

पण रेल्वे ही वाहतुकीचे साधन असून कँटिन अथवा रेस्टॉरंट रेल्वेला मानता येणार नसल्यामुळे अशा खाद्य-पेयांवर पूर्ण १८ टक्के जीएसटी लागेल. ही सेवा नसल्यामुळे ही विक्री/वस्तू पुरवठा जीएसटीच्या पूर्ण दरास पात्र असल्याचे अ‍ॅथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने म्हटले आहे. आऊटडोअर कॅटरिंगद्वारे यापूर्वी पुरविल्या जाणा-या खाद्य-पेयांवर १८ टक्के व कँटिनमधील खाद्यपेयांवर ५ टक्के जीएसटी लावण्याची तरतूद होती. पण रेल्वेला पुरवठा होणा-या खाद्य-पेयांवरही सवलतीच्या ५ टक्के दरात जीएसटी लागेल, असे परिपत्रक केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने काढले होते.

त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थांवर वेगवेगळा जीएसटी दर लागेल असे एएआरने म्हटले आहे. तसेच थंड किंवा गरम करुन सामानाच्या विक्रीवरही टॅक्समध्ये सूट मिळणार नाही. जी कंपनी रेल्वेला सामान पुरवेल त्यांनाही १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल.

Leave a Comment