बिहारच्या एका छोट्या गावातील तरुणीला गुगलकडून एक कोटी रुपयांचे पॅकेज


नवी दिल्ली – जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी गुगलने बिहारची राजधानी पटना येथील एका छोट्या गावात राहणा-या मधुमिता शर्माची मुलाखतीच्या ७ फे-यांनंतर तिला एक कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. मधुमिता गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात सोमवारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती आहे.

गुगलच्या स्विझर्लंड येथील मुख्य कार्यालयात मधुमिताची टेक्निकल सोल्यूशन इंजिनिअर या पदासाठी निवड झाली आहे. लहानपणापासूनच एखाद्या मोठ्या कंपनीत करण्याचे स्वप्न मधुमिता पाहायची, तिला आज अखेर मेहनतीचे फळ मिळाले, तिला मिळालेले यश पाहून सर्वच आनंदी असल्याचे मधुमिताची आई चिंता शर्मा म्हणाल्या. मधुमिता परदेशामध्ये अडीच महिन्याच्या कालावधीत गुगल इंटरव्ह्यूच्या सात फे-या पास झाली. मधुमिता इंटरव्ह्यू पास होणारी भारतातील एकमेव उमेदवार होती आणि तिची गुगलने निवड केली.

Leave a Comment