गुगलने केली अँड्राईड पी ची अधिकृत घोषणा


मंगळवारी गुगलने त्याच्या नव्या अँड्राईड पी या मोबाईल ओएसची घोषणा आय/ ओ २०१८ डेव्हलपर कॉन्फरन्स मध्ये केली आहे. या नव्या ओएस मध्ये गुगलने कोर स्ट्रेंथ एआय व मशीन लर्निंगवर आदिक भर दिला असल्याचे समजते. सर्च इंजिन गुगलने नव्या व्हर्जन मध्ये अॅडाप्टीव्ह बॅटरी, अॅडाप्टीव्ह ब्राईटनेस, अॅप अॅक्शन स्लायसेस शिवाय अन्य फिचर दिली आहेत.

अॅडाप्टीव्ह बॅटरी मध्ये युजर जी अॅप आणि सेवा नेहमी वापरतो त्या अॅप आणि सेवांना पॉवर प्राधान्याने पोहोचविली जाते यामुळे युजरच्या स्मार्टफोनची बॅटरी जादा वेळ चालू शकते. ब्राईटनेस फिचरचा वापर मशीन लर्निंगच्या वापरत उपयुक्त आहे.यामुळे युजर वेगवेगळ्या सेटिंग मध्ये कोणत्या प्रकारच्या ब्राईटनेसला युजरने प्राधान्य द्यावे याची माहिती मिळते. अॅक्शन युजरने जादा वेगवान आणि रचनात्मक कसा होऊ शकेल याची भविष्यवाणी केली जाते. आणि स्लायसेस युजर जी अॅप सर्वाधिक वापरतो त्याची अधिक माहिती देते.

Leave a Comment