वनप्लस सिक्स २१ मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी वनप्लस चा नवा स्मार्टफोन वनप्लस सिक्स १७ मे रोजी मुंबई एका इवेन्ट मध्ये लाँच केला जात असून हा फोन २१ मे ला विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी कंपनीने भारत व अन्य देशात पॉप उप इवेन्ट होत असल्याचे जाहीर केले असून भारतात मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद, चेन्नई, बंगलोर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. तेथे २१ मे नी २२ मे रोजी स्टॉक असेपर्यंत फोन विक्री केली जाणार आहे.

हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सह येत आहे. अँड्राईड ओरिओ ८.० ओएस, ५.७ इंची सुपर एमोलेड डिस्प्ले, डूअल सीम, एलईडी फ्लॅश सह २३ एमपीचा रिअर कॅमेरा, १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ३५०० एमएएचची बॅटरी अशी त्याची अन्य फीचर्स असून फोनवर मोठी नॉच दिसते आहे. हा ४ जी सपोर्ट करतो आणि त्याला फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.