देशात लाँच होताहेत २२ इलेक्ट्रिक कार मॉडेल्स


केंद्र सरकारने २०३० पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे ध्येय ठेवले असतानाच देशातील टाटा, महिंद्र सारख्या स्थानिक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने उत्पादन वाढवीत आहेतच पण अन्य कार उत्पादक कंपन्याही इलेक्ट्रिक वाहनांची विविध २२ मॉडेल्स बाजारात आणत असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात एका सुनावणी दरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्णाला उत्तर देताना हि माहिती देण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक कार्स बाबत काय करत आहेत असा सवाल केला होता. त्यावर सर्व प्रकारची इलेक्ट्रिक वाहने बनविण्याचे देशातील प्रमाण वेगाने वाढत असल्याचे सांगितले गेले होते. यावरची पुढील सुनावणी १३ जुलैला होणार आहे.

Leave a Comment