रिलायंस जिओने लाँच केला इंटरअॅक्ट प्लॅटफॉर्म


जगातील पहिलाच आर्टिफीशिअल इंटेलीजंस आधारित ब्रांड एंगेजमेंट प्लॅटफॉर्म इंटरअॅक्ट लाँच करण्यात रिलायंस जिओने जगात बाजी मारली आहे. या सेवेमध्ये लाइव्ह व्हिडीओ कॉल शिवाय अनेक सेवा दिल्या जाणार आहेत. जगातील नामवंत लोकप्रिय व्यक्ती त्यात सहभागी होणार आहेत. त्या संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत.

यात सर्वप्रथम बॉलीवूड बादशाह बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन त्यांच्या नव्याने रिलीज झालेल्या नॉट आउट १०२ चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. त्यानंतर जिओ व्हिडीओ कॉल सेंटर, व्हिडीओ कॅटलॉग व व्हर्चुअल शोरूम सारख्या सेवा सुरु केल्या जाणार आहेत. ४ मे या दिवशी जिओ युजर वा अन्य स्मार्टफोन युजर बिग बी ना दिवसा व्हिडीओ कॉल करून नॉट आउट १०२ संबंधी प्रश्न विचारू शकतील. या सेवेत जगात प्रथमच आर्टिफीशिअल इंटेलीजंसचा वापर केला जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment