…म्हणून व्हाट्सअॅपच्या सह-संस्थापकाने फेसबुकला दिली सोडचिठ्ठी


सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडियावर वापरले जाणारे सध्याचे सर्वात लोकप्रिय अॅप म्हणजे व्हाट्सअॅपचे सह-संस्थापक जेन कॉम यांनी फेसबुकला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली असून आपला निर्णय सांगताना जेन यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, मला स्वत:ला वेळ द्यायचा असून आपण त्यासाठी पद सोडत आहोत.

याबाबत अमेरिकेतील प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार त्यांचे फेसबुक, व्हाट्सअॅपच्या माध्यमातून यूजर्सच्या लिक झालेल्या डेटावरून फेसबुकसोबत काही मतभेद झाले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये जेन कॉम यांनी म्हटले आहे की, ब्रायन एक्टन यांच्यासोबत मी सुमारे १० वर्षांपूर्वी व्हाट्सअॅपची सुरूवात केली. काही चांगल्या लोकांसोबतचा प्रवास चांगला राहिला. पण आता वेळ आली आहे याहीपेक्षा पुढचे पाऊल टाकण्याची. उल्लेखनीय असे की, ब्रायन यांनी गेल्याच वर्षी फेसबुक सोडले होते.

आपल्या पोस्टमध्ये जेन कॉम यांनी पुढे म्हटले आहे की, अशा वेळी मी कंपनी सोडत आहे की, ज्या वेळी लोक माझ्या कल्पनेपेक्षाही मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅप वापरू लागले आहेत. व्हाट्सअॅपची टीम ही आज पहिल्यापेक्षाही अधिक मोठी आणि सक्षम आहे. मी आयुष्यातील काही काळ तंत्रज्ञानापासून दूर राहू इच्छितो. मी या काळात माझ्या कारने प्रवास करेन. तसेच, खेळही खेळेण. माझा जीवनप्रवास सुंदर केल्याबद्धल धन्यवाद! फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने जेन कॉमच्या पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे की, जेन कॉमची कमी मला जाणवेल. जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी आपण जे केले आहेत तसेच, आपल्याकडून मला जे शिकायला मिळाले त्याबाबत धन्यवाद.

Leave a Comment