दुकाटीची मॉन्स्टर ८२१ भारतात लॉन्च


मुंबई : भारतात दुकाटीने आपली बहुचर्चित मॉन्स्टर ८२१ बाइक लॉन्च केली असून ९ लाख ५१ हजार रूपये ऐवढी या बाईकची किंमत ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक प्रतिलीटर १८ किमी मायलेज देणार असल्याचा दावा केला आहे. ही बाईक डिजिटल लॉन्च करण्यात आली, ही बाईक ट्वीटरवर लॉन्च करण्यात आली. एलईडी हेडलॅम्प देखील यात अपडेट करण्यात आले आहेत, फुल कलर टीएफटी इन्स्टुमेंट कन्सोल यात आहे, जो स्मार्टफोनसोबत पेअर केला जाऊ शकतो.

तीन रायडिंग मोडस याआधी येणाऱ्या मॉन्सटरमध्ये ८२१ मॉडेलवर दिले होते. प्रत्येक मोडवर थ्रॉटल रेस्पॉन्स, एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोलसाठी वेगवेगळ्या सेटिंग्ज आहेत. ब्रॅम्बो कॅलिपर्स यात आहे, यात पहिल्या चाकात ३२० एमएम डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकात २४५ एमएम डिस्क ब्रेक आहेत. ही बाईक रेग्युलर ब्लॅक, रेड आणि येलो शेडमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment