तुम्ही घेणार का डेनीमची ‘ही’ ११ हजारची जीन्स?


आरामदायी किंवा ज्यात सहज वावरता येईल म्हणून आपण जीन्सला प्राधान्य देतो. जीन्ससाठी इतर कपड्यांसारखे इस्त्री करण्याचे किंवा वारंवार धुण्याचे कष्ट घ्यावे लागत नसल्यामुळे सध्याची तरुणाई जीन्सला सर्वाधिक पसंती देते. सध्या बाजारात फॅशन ट्रेंड्सप्रमाणे वेगवेगळ्या जीन्स उपलब्ध आहेत.

पण एका भलत्याच जीन्स ट्रेंडने सध्या फॅशनविश्वात धुमाकूळ घातला आहे. लॉस एन्जलिसमधील ‘चार्मर’ या डेनीम ब्रँडने एक्स्ट्रीम कट आऊट जीन्स बाजारात आणली असून ही जिन्स आहे की चिंध्या? हे जीन्स तयार करणाऱ्यालाच माहित असेल. पण सध्या जगभरात चार्मरचे हे कलेक्शन चर्चेचा विषय ठरला आहे. या जीन्सची किंमत १६८ डॉलर म्हणजे जवळपास ११ हजार रुपयांहूनही अधिक आहे. या जीन्सकडे पाहून आता त्याची किंमत ११ हजार का ठेवली आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Leave a Comment