‘द संडे टेलिग्राफ’चा दावा; ट्विटरनेही विकला डेटा


मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट अग्रगण्य असणाऱ्या फेसबुकनंतर ट्विटरचेही डेटा लीक प्रकरणात आता हात काळे झाले असल्याचे उजेडात आले आहे. ब्रिटनमधील वृत्तपत्र ‘द संडे टेलिग्राफ’च्या अहवालानुसार केंब्रिज अॅनालिटिकाला ट्विटरनेही डेटा विकल्याचे उघड झाले आहे.

२०१५मध्ये ट्विटरकडून कॅम्ब्रिज अनालिटिकाचा संस्थापक अलेक्जांद्र कोगनने यूजर्स डेटा खरेदी केला होता. त्याने यासाठी ग्लोबल सायन्स रिसर्च नावाने एक फर्म तयार केली होती. असाही दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे की, कोगनने अनेक यूजर्सचे ट्वीट, यूजरनेम, फोटो, प्रोफाईल फोटो, आणि लोकशन हा संपू्र्ण डेटा मिळवला होता.

लोकांची मानसिकता ट्विट्स आणि सोशल मीडियावरुन समजून घेण्यासाठी कंपन्या डेटा विकत घेतात. कारण की, ते आपले प्रोडक्ट विकण्यासाठी त्याप्रमाणे प्लॅनिंग करतात. पण लोकांचे राजकारणाबद्दल सध्या सामान्य मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी डेटा खरेदी केला जात असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment