इराण सरकारच्या नव्या अॅपमध्ये ‘अमेरिका मुर्दाबाद’च्या इमोजी


इराण सरकारने सुरू केलेल्या एका नवीन अॅपमध्ये ‘अमेरिका मुर्दाबाद’च्या इमोजी देण्यात आल्या आहेत. अमेरिकेसोबतच इस्राएल आणि फ्रीमेसन यांनाही लक्ष्य करणारे ईमोजी यामध्ये देण्यात आले आहेत.

इराण सरकारने नुकतेच सोरूश मेसेंजर हे संदेशवाहक ॲप आणले आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेश वाहक ॲपला टक्कर देण्यासाठी हे ॲप सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात इराणमध्ये झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांना टेलिग्राम हे ॲप जबाबदार असल्याचे इराण सरकारचे मत आहे. त्यामुळे टेलिग्रामला पर्याय म्हणून सोरूश हे ॲप आणण्यात आले आहे.

या ॲपमध्ये बुरखा घेतलेल्या महिलांच्या ईमोजी आहेत, तसेच अमेरिका, इस्राएल आणि फ्रीमेसन यांना लक्ष्य करणार्‍या ईमोजी आहेत. सोरूश ॲपच्या पहिल्या पाच वापरकर्त्यांना पुरस्कार म्हणून 5 सोन्याची नाणी देण्यात येतील, असे टेलिग्रामवरील सुरुच्या खाद्यावर म्हटले आहे.

सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी हे सोरूशवर नोंदणी करणारे पहिले वापरकर्ते ठरले आहेत. तसेच आपण टेलिग्रामवरील आपले खंत बंद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. इराणमधील पाच कोटी लोक टेलिग्राम वापरतात तर 50 लाख वापरकर्त्यांनी सोरूशवर नोंदणी केली आहे, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment