आता गुगल करणार तुम्हाल नोकरी शोधण्यात मदत !


गुगलने नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक खास सेवा सुरू केली असून गुगलने ही सेवा सर्वप्रथम गेल्या वर्षी अमेरिकेत सुरू केली होती. गुगलच्या नव्या फीचरचे नाव गुगल फॉर जॉब्स असे असून नोकरीच्या शोधात असणा-यांचे काम याद्वारे सोपे व्हावे हा गुगलचा प्रयत्न आहे.

हे फीचर सध्या इंग्रजी भाषेतच उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर गुगलची काही राज्य सरकारांसोबतही बोलणी सुरू आहेत. अनेक कंपन्यांसोबत गुगलने भागीदारी केली आहे. गुगलने TimesJobs, Shine.Com आणि LinkedIn यांसारख्या अनेक संकेतस्थळांसोबतही भागीदारी केली आहे. नोकरीचा शोध घेणे या फीचरद्वारे सोयीस्कर व्हावे हा गुगलचा प्रयत्न आहे.

केवळ Jobs near me किंवा Jobs for fresher असे कीवर्ड्स गुगल सर्चमध्ये लिहिल्यास तुमच्या समोर गुगलचा नवा डॅशबॉर्ड सुरू होईल. नोक-यांची यादी येथे तुम्हाला दिसेल, तेथे क्लिक करुन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एका जॉब व्हॅकेन्सीवर क्लिक केल्यास तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. सर्वप्रथम नोकरीबाबत माहिती असेल, त्यानंतर पात्रता किती असावी याबाबत आणि कोणत्या संकेतस्थळावर नोकरीची माहिती आहे हे दिसेल आणि तुम्ही तेथून अर्ज करु शकतात. येथे सेव्ह करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

नोकरी शोधताना तुम्ही प्रेफेरेंस सेट करु शकतात. म्हणजे पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब, लोकेशन, जॉब टायटल आणि अनुभव आदी गोष्टी तुम्हाला हव्या त्याप्रमाणे सेट करता याव्यात यासाठी कंपनीने स्मार्ट फिल्टर दिलं आहे. तसंच यामध्ये अलर्ट फीचर देखील आहे , म्हणजे तुम्ही शोधत असलेल्या नोकरीसारखी एखादी संधी असेल तर तुम्हाला इमेल पाठवून माहिती दिली जाईल.

Leave a Comment