डीटेलचा नवा डी १ टॉकी फिचर फोन लाँच


फिचर फोन ब्रांड डीटेल ने त्यांचा नवा हँडसेट डिटेल डी १ टॉकि नावाने बाजारात आणला असून त्याची किंमत आहे ६९९ रुपये. ज्या युजरना लिहिणे वाचण्यात अडचणी आहेत अथवा जे युजर डोळ्याने अधू आहेत त्यांना या फोनचे टॉकी फिचर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तसेच या फोनला केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महिला सुरक्षेसाठी पॅनिक बटण दिले गेले आहे.

या फोनमध्ये एसओएस अॅलरट आहे तसेच टॉकी फिचरमुळे युजर फोनवर बोलून कॅमेरा, गॅलरी, डॉक्युमेंट फिचर अॅक्सेस करू शकणार आहेत. हा फोन डूअल सीम आहे. त्याचबरोबर त्याला फ्लॅश सह कॅमेरा, कॉल ब्लॅक लिस्ट, जीपीआरएस वेब ब्राऊझर, वायरलेस एफएम अशी फिचर आहेत. या फोनसाठी एक वर्षाची वॉरंटी असून हा ४ जी ला सपोर्ट करतो. भारतात सर्वप्रथम डूअल सीम फिचर फोन सादर करणारा हा पहिलाच ब्रांड आहे. डिटेल ने गेल्या महिन्यात चार फिचर फोन सादर केले आहेत.

Leave a Comment