सुंदर पिचाई यांच्यावर पैशाचा पाऊस बरसणार


गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर या आठवड्यात पैशांचा पाऊस बरसणार आहे. ब्लूमबर्गने नुकत्याच जारी केलेल्या अहवालानुसार पिचाई यांना २०१४च्या प्रमोशनच्या पूर्वी अॅवॉर्ड म्हणून मिळालेले ३,५३,९३९ रीस्ट्रीकटेड शेअर ते आता विकू शकणार आहेत. हे शेअर त्यांना गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट कडून दिले गेले होते. हे शेअर ठराविक काळानंतर विकता येतात त्यानुसार आता पिचाई ते विकणार आहेत.

या शेअरचे सध्याचे मूल्य ३८० दशलक्ष डॉलर म्हणजे अडीच हजार कोटी इतले आहे. यामुळे कोणत्याही क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या एक्झिक्युटिव्हला आत्तापर्यंत दिलेल्या पेआउट पेक्षा हि रक्कम सर्वाधिक ठरली आहे. पिचाई यांनी २०१५ साली गुगल चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Leave a Comment