अफवा पसरवणाऱ्यांना दणका देणार व्हॉट्सअॅपचे हे फिचर


मुंबई : अफवा पसरवल्यामुळे होणारे नुकसान केवढे घातक ठरू शकते याचे उदाहरण नुकत्याच झालेल्या भारत बंद दरम्यान दिसून आले. पण आता व्हॉट्सअॅपचे अशा अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन फिचर येणार आहे. एखादा मेसेज व्हॉट्सअॅपवर जास्तवेळा फॉरवर्ड झाला, तर तो आता पकडता येणार आहे. अशा अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे. एखादा मेसेज जर २५ पेक्षा जास्त लोकांना पाठवण्यात आला असेल तर या मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे लगेच पकडता येईल, असे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे. फक्त मोबाईलवर येणारे मेसेज हे फिचर रोखणार नाही तर मोबाईलला हॅकिंग आणि डेटा चोरीपासूनही वाचवणार आहे.

जास्त जणांना एखादा मेसेज पाठवला तर त्याची ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. तसेच एकच मेसेज अनेकांना पाठवला तर फॉरवर्डेड मेनी टाईम्स असा मेसेज येईल. एवढच नाही तर संशयास्पद मेसेज फॉरवर्ड करताना व्हॉट्सअॅपकडून इशाराही देण्यात येईल. तसेच तुम्ही पाठवलेला मेसेज अनेक जणांना फॉरवर्ड झाला आहे, अशी सूचनाही व्हॉट्सअॅपवर येणार आहे.

Leave a Comment