तुमचे केस तुमच्या भविष्याचा आरसा


सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीचे केस पाहून तिचे शारीरिक आरोग्य कसे असावे ह्याचा अंदाज बांधता येतो. म्हणजेच केस जर चमकदार, दाट, निरोगी असतील, तर ते त्या व्यक्तीच्या एकंदर शारीरिक आरोग्याचे, संतुलित आहाराचे प्रतीक असतात. ह्याच उलट जर केस गळत असतील, शुष्क, राठ असतील, त्यांमध्ये स्प्लिट एन्ड्स असतील, तर त्या केसांना पुरेशी निगा मिळत नसल्याचे लगेच लक्षात येते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आरोग्य कसे असावे ह्याची साक्ष त्या व्यक्तीचे केस देत असतात. पण व्यक्तीच्या केसांवरून त्याचे भविष्य देखील कळू शकते असे म्हटले, तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. हे तथ्य ऐकून थोडेसे विचित्र वाटत असले, तरी सामुद्रिक शास्त्र ह्या तथ्याची पुष्टी करते.

सामुद्रिक शास्र्त्रामध्ये शरीराच्या अंगांची बनावट लक्षात घेऊन त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, आणि त्या व्यक्तीचे भविष्य कसे असेल, हे जाणून घेण्याचे अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. सामुद्रिक शास्त्राची रचना सामुद्र ऋषींनी केली होती. ह्यामध्ये ज्योतिष्याच्या भविष्यवाणी शिवाय, केवळ केसांवरून भविष्य कसे जाणून घेता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार जाड आणि राठ केस असणाऱ्या व्यक्तींना आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक असते. ह्या व्यक्तींच्या बाबतीत तब्येतीच्या लहान मोठ्या तक्रारी सतत उद्भवत असतात. त्यामुळे ह्या व्यक्तींनी आपया तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींचे केस सरळ आणि मुलायम असतात, त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये सतत काही ना काही करीत राहण्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत असतात. अश्या व्यक्ती बहुतेकवेळी आपले काम चोखपणे करणाऱ्या आणि स्पष्टवक्त्या असतात. त्यांना काम करणे आवडते आणि तश्या संधी त्यांना वारंवार मिळत राहतात. तसेच ज्या व्यक्तींचे केस अतिशय पातळ असतात, त्या व्यक्तींना आयुष्यामध्ये सतत अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

ज्या व्यक्तींच्या केसांमध्ये स्प्लिट एन्ड्स असतील, म्हणजेच ज्यांचे केस टोकाशी दुभंगलेले असतील, त्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलता येण्याची शक्यता असते. अश्या व्यक्ती दोन वेगवेगळ्या विचाराधारांमध्ये गुंतून राहून कोणत्याही दृढ निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ह्या लोकांना कोणत्याही कामामध्ये सहजगत्या सफलता मिळत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment