अच्छे दिन : पेट्रोल ४ तर डिझेल ६ रुपयांनी महागले


मुंबई : देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात ५ वर्षांत प्रथमच मोठी वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून शुक्रवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत ७४ रुपये ८ पैसे प्रति लीटर होती. सप्टेंबर २०१३ नंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. डिझेलची किमत दिल्लीत ६५ रुपये ३१ पैसे प्रति लीटर झाले आहे. यापूर्वी कधीही डिझेल एवढे महाग झालेले नव्हते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमत वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी कच्चा तेलाचा दर हा बदलत असतो. जशी जशी कच्चा तेलाची किंमत बदलत आहे, त्याप्रमाणात पेट्रोल आणि डिझेल महाग होत आहे. २०१४ नंतर कच्चा तेलाच्या किंमती या सर्वाधिक राहिल्या आहेत.

पेट्रोलच्या किमतीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वाढ झाली. पेट्रोल ५० पैशांनी महाग झाले तर डिझेल ९० पैशांनी महाग झाले. या वर्षाच्या सुरुवातील ४ महिन्यात पेट्रोलची किंमत ४ रुपयांनी वाढली. डिझेलच्या किमतीत ५-६ रुपयांनी वाढले. हे कोणत्याही वर्षात ऐवढी वाढ झालेली नाही. दरम्यान, सरकार जीएसटीमुळे पेट्रोल-डिझेल आणण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पुन्हा दर वाढीचे संकट आहे.

Leave a Comment