नटराजाच्या तांडव नृत्यावरून प्रेरित रॉयल एन्फिल्ड बाईक


अनेक वर्षे रॉयल एन्फिल्ड बाईकची क्रेझ जनमानसात टिकून आहे. ही बाईक कस्टमाईज करून घेण्याची क्रेझही जबरदस्त आहे. यामुळेच अनेक कंपन्यांनी अनेक प्रकाराने तिचे रुपडे सजविले आहे. मुंबई मराठा मोटारसायकल्सने रॉयल एन्फिल्डला असेच एक आगळे रूप दिले असून त्यासाठी थंडरबर्ड ३५० क्रुझर मॉडेल वापरले गेले आहे. या निमित्ताने या बाईकचा संपूर्ण मेकओव्हर केला गेला आहे.


शिवाचा अवतार नटराज याच्या तांडव नृत्यावरून प्रेरणा घेऊन हा मेकओव्हर केला गेला असून त्यामुळे बाईकचे नावही नटराज असेच ठेवले गेले आहे. यात सर्वात मुख्य बदल म्हणजे चेन ड्राईव्ह बेल्ट ड्राईवमध्ये बदलला गेला आहे. कॉस्मिक फायरझोन वलये पेंट केली गेली असून हि निर्मिती आणि विनाश या शक्तींची आठवण करून देतात. धुरकट रंग शांत गंगेचे प्रतिक आहे. अॅलॉय व्हील्स, कॉफिनच्या आकाराची इंधन टाकी, फ्रंट फेंडर, काऊल साईड पॅनलवर नटराज तांडव नृत्याची कलाकारी केली गेली आहे. इन्व्हरटेड सस्पेन्शन, मोनोशॉक दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी आरामदायक आहेत.


ड्रेन्ग स्टाईल हँडलबार, इंजिनमध्ये कोनिकल एअरफिल्टर सह ३४६८ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन, ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन सह दिले गेले आहे तसेच डूअल हेडलँप एलईडी लाईट सह आहेत.

Leave a Comment