तुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप


आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी जमेल त्याप्रमाणे आपल्या आहाराची काळजी घेत असतो, त्याला योग्य व्यायामाची देखील जोड देत असतो. पण ह्या दोन्ही गोष्टी सांभाळताना ह्याला आणखी एका गोष्टीची जोड मिळाली, तर आपल्या शरीराचे आरोग्य आणखी सुधारण्यासाठी वाव मिळेल असे आहारतज्ञांचे मत आहे. म्हणूनच फूड एक्स्पर्टस् चे मत विचारात घेता, आपल्याला केवळ संतुलित आहार घेणे आवश्यक नाही, तर आपल्या रक्तागटाला अनुरूप आहार आपण घ्यायला हवा.

प्रत्येक रक्तगटाचा स्वतःचा असा एक खास ‘अँटीजेन मार्कर’ असतो. हा मार्कर आपण घेत असलेल्या आहाराला पचविण्यास सहायक असतो. विशेष गोष्ट अशी, की हा अँटीजेन मार्कर वेगवेगळ्या पदार्थांशी वेगवेगळा ‘ री अॅक्ट ‘ होत असतो. ह्या रिअॅक्श्न लक्षात घेऊन जर आपण आपला आहार योजिला, तर ह्याचे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे होऊ शकतात. न्यूट्रीशनिस्टस् च्या मते प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये काही खास गुण असतात. त्यामुळे त्या त्या रक्तगटाच्या व्यक्तींना त्या त्या रक्तगटाला साजेसा आहार दिला गेला, तर ते जास्त आरोग्यपूर्ण ठरते.

‘ब’ रक्तगटाच्या लोकांसाठी अनेक प्रकारचे अन्नपदार्थ साजेसे आहेत. ह्यामध्ये अनेक तऱ्हेचे मांस, भाज्या, धान्ये यांचा समावेश आहे. पण तरीही या रक्तगटाच्या लोकांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे. म्हणजेच दिवसा मांसाहारी भोजन केले असले, तर या व्यक्तींनी रात्रीच्या जेवणामध्ये शाकाहारी पदार्थ प्रामुख्याने खावेत. ‘अ’ रक्तगटाच्या व्यक्तींसाठी हिरव्या पालेभाज्या, धान्ये, अंकुरित कडधान्ये, फळे, सुकामेवा, ब्रेड, पास्ता, नूडल्स किंवा तत्सम पदार्थ, ह्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ह्या व्यक्तींनी मांसाहारी पदार्थ, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, गहू या पदार्थांचे सेवन कमी करावे.

एबी रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी ‘अ’ आणि ‘ब’ गटासाठी सुचविलेल्या आहाराचा सुवर्णमध्य साधावा. व्यायाम आणि आहार ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेता, तुमचे आरोग्य हे तुमच्या आहारवर ऐंशी टक्के, तर उर्वरित वीस टक्के तुमच्या व्यायामावर अवलंबून असते. त्यामुळे संतुलित आहाराला जर रक्तगटाप्रमाणे आहार घेण्याची जोड दिली, तर आरोग्य निश्चितच उत्तम राहण्यास मदत होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment