आता फेसबुकवरून करता येणार करा मोबाइल रिचार्ज


नवी दिल्ली: सोशल नेटवर्किंगमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या फेसबुकवरून आता मोबाइल रिचार्ज देखील करता येणार आहे. यासाठी तुमच्याकडे एंड्रॉईड फोन असेल तर फेसबुकचे मोबाइल रिचार्ज फीचर फोनवर उपलब्ध आहे. कोणत्याही कंपनीचे रिचार्ज फेसबुकच्या मोबाइल रिचार्ज फीचर वरून करता येणार आहे. पण फेसबुकचे हे नवीन मोबाइल रिचार्ज फीचर आयफोन वापरणाऱ्यांना मिळायला उशीर होणार आहे. लवकरच हे फीचर आयओएस आणि डेस्कटॉपवर देखील मिळणार असून पोस्टपेड बिलाचा भरणा देखील यावरून नंतर करता येणे शक्य होणार आहे.

फेसबुकचे नवीन अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणार आहे. फेसबुकचे नवीन अँप डाउनलोड केल्यानंतर त्यावर मोबाइल रिचार्जचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन फीचरसाठी हॅम्बर्गर आयकॉनवर क्लिक करा. मोबाईल रिचार्जचा पर्याय निवडा किंवा काही व्हर्जनमध्ये मोबाईल टॉप-अप नावाने हा पर्याय उपलब्ध असेल. स्क्रीनवर मोबाईल रिचार्जचा पर्याय न दिसल्यास See More option मध्ये जाऊन एकदा पर्याय पहा. मोबाइल रिचार्ज पर्यायावर पोचल्यावर फेसबुकवर वेलकम स्क्रीन दिसेल. यांनतर तुम्हाला क्रेडिट अथवा डेबिट कार्डाचा पर्याय विचारला जाईल. क्रेडिट अथवा डेबिट पर्यायानंतर ‘रिचार्ज नाउ’ बटनावर क्लिक करावे लागेल. यांनतर मोबाईल फोन नंबर विचारला जाईल. शिवाय मोबाईल ऑपरेटरची निवड करायची किंवा फेसबुक स्वतः नंबरवरून योग्य ऑपरेटरची निवड करेल. नंतर किती रुपयांचे रिचार्ज आणि कोणता पॅक उपलब्ध आहे ते दाखवले जाईल. सर्व पर्यायांची निवड केल्यांनतर पेमेंट करण्यासाठी सांगितले जाईल. यात आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा तपशील विचारला जाईल. अखेर ‘प्लेस आर्डर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर रिचार्ज होणार आहे. डेबिट किंवा क्रेडिटच्या माध्यमातूनच सध्या फेसबुक अँपद्वारे मोबाइल रिचार्ज करता येणार असल्यामुळे इतर कोणत्याही वॉलेटला पेमेंटसाठी हे जोडता येणार नाही.

Leave a Comment