टेलरिंगचे काम करणाऱ्या मुलाला मिळाली १९ लाखांच्या पॅकेजची नोकरी


नागपूर- घरच्या गरिबीवर मात करत नागपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या केरळमधील मुलाने लाखो रुपयांचे पॅकेज असणारी नोकरी मिळविली आहे. आयआयएम नागपूरमध्ये केरळमधील कोल्लम शहरात राहणाऱ्या जस्टिन फर्नांडिस या मुलाने शिक्षण पूर्ण केले. अतिशय गरिब कुटुंबातून जस्टिन होता. त्याच्याकडे कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सोयी-सुविधाही नव्हत्या. आपण मिळविलेल्या यशावर जस्टीनचाही विश्वास बसत नाही आहे. हैदराबाजमधील व्हॅल्यू लॅब या कंपनीमध्ये जस्टीनला असिस्टंट डायरेक्टर पदावर १९ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असणारी नोकरी मिळाली आहे. आयआयएम नागपूरमधील हा एक रेकॉर्ड आहे.

टेलरिंगचे काम जस्टिनचे कुटुंब करते. पण या कामात त्यांना खूप नुकसान सहन करावे लागले. जस्टिनचे आजोबा टेलर होते. वडिलही टेलरिंगचे काम करतात. पण त्यांच्या व्यवसायावर रेडिमेड कपड्यांच्या ट्रेण्डमुळे परिणाम झाला. या कामामुळे घरातील खर्चही निघत नाही, असे जस्टिनने सांगितले. सर्वकाही शिक्षण बदलू शकते असा विश्वास जस्टिनच्या काकुला होता. त्यामुळे त्याने अभ्यास करण्यात जराही तडजोड केली नाही. जस्टिनच्या काकुने त्याचे व त्याच्या बहिणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून दिल्यानंतर त्रिवेंद्रमधील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर संपूर्ण खर्च स्कॉलरशिपवर होऊ लागला.

Leave a Comment