पेट्रोलचे दर नव्वदी पार करणार !


मुंबई : सध्या ८० रुपयांच्या घरात पेट्रोलचे दर गेलेले असतानाच यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता तब्बल ९० रुपयांच्या घरात पेट्रोलचे दर जाण्याची शक्यता आहे.

कच्च्या इंधनाचे दर सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कमालीचे वाढण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या ७२ डॉलर प्रतिबॅरल असलेले क्रूड ऑईल ८० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होऊ शकते. अशात अमेरिका आणि युरोपियन युनियनने सीरियासह तेलउत्पादक देशांवर आर्थिक निर्बंध घातल्यानं ही स्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोलचे दर आधीच गगनाला भिडलेले असताना भारतातील सर्वसामान्यांना मध्यपूर्वेतील या अस्थिरतेचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण इंधनाचे दर वाढल्याने प्रवासासह जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment