भारताचा विकासदर यंदा ७.३ टक्क्यांनी वाढणार


नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षांत (२०१८-१९) भारताचा विकास दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक बँकेच्या मते, जीएसटी लागू झाल्यानंतर आलेल्या अल्पकालीन घसरणीतून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर आली आहे. त्यांच्या मते, आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेतील विकासाचा दर हा ७.५ टक्क्यांवर येईल. भारताला जागतिक बँकेच्या या अहवालामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थेवरील एका अहवालात जागतिक बँकेने म्हटले आहे की, जगातील सर्वांत वेगाने वाढण्याचा दर्जा भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे या क्षेत्राने (दक्षिण आशिया) पुन्हा एकदा मिळवला आहे. भारताचा आर्थिक विकास दर २०१७ मध्ये ६.७ टक्क्यांवरून वाढून २०१८ मध्ये ७.३ टक्के होऊ शकतो.

Leave a Comment