फेसबुकने आपल्या अॅपमध्ये केले महत्वपूर्ण बदल!


मुंबई : फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर केम्ब्रिज अॅनालिटिकामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ही विश्वासार्हता आता पुन्हा मिळवण्यासाठी फेसबुकने पावले उचलण्यास सुरुवात केली असून भारताचाही संबंध केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणाशी जोडला गेल्यामुळे भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी फेसबुकने आपल्या अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर फेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्स नियंत्रण ठेवू शकतात. आपली माहिती कुठली वेबसाईट वापरु शकते, हे आता युजर्सच्या हातात असेल. युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या वैयक्तिक माहितीचा वापर इतर कुणालाही फेसबुकच्या माध्यमातून वापरता येणार नाही. फेसबुकने त्यासाठीच काही महत्त्वाचे बदल अॅपमध्ये केले आहेत.

जाणून घ्या फेसबुकने आपल्या अॅपमध्ये केलेले बदल
पहिल्यांदा फेसबुक अकाऊंट लॉग इन करा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. डाव्या बाजूस असलेल्या ‘Apps and Websites’ या पर्यायावर क्लिक करा. अॅक्टिव्ह, एक्स्पायर्ड आणि रिमूव्ह्ड असे तीन तिथे पर्याय दिसतील. अॅक्टिव्ह पर्यायाखाली असलेल्या वेबसाईट्सना तुम्ही माहिती शेअर करत आहात. त्यातील नको असलेल्या वेबसाईट सिलेक्ट करुन रिमूव्ह करता येतात. पुढे एक्स्पायर्ड पर्याय आहे. त्यात अर्थात एक्स्पायर्ड वेबसाईट्स असतात. त्याही रिमूव्ह करता येतात. पुढे रिमूव्ह्ड पर्याय आहे. तिथे तुम्ही परवानगी नाकारलेल्या सर्व वेबसाईट्स दिसतात.

Leave a Comment