व्हॉट्सअॅपवरून डिलीट झालेली फाईल पुन्हा डाऊनलोड करता येणार!


मुंबई : अँड्रॉईड युझर्ससाठी व्हॉट्सअॅपने नवे फीचर आणले असून फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड न होणे ही सर्वात मोठी समस्या युझर्ससाठी होती. पण ही समस्या व्हॉट्सअॅपने आता दूर केली असून व्हॉट्सअॅपवर फोनमधून डिलीट झालेल्या फाईल्स पुन्हा डाऊनलोड करता येतील.

मोबाईलमधील फोटो, जीआयएफ, व्हिडीओ, ऑडिओ किंवा एखादी डॉक्युमेंट फाईल एखाद्या युझरने डिलीट केली असेल तर ती व्हॉट्सअॅप सर्व्हरच्या मदतीने पुन्हा डाऊनलोड करता येईल. जिथून ही फाईल आलेली असेल तुम्हाला त्या चॅटमध्ये डिलीट केलेलीही फाईल आता मिळेल.

याबाबत WABetaInfoणे दिलेल्या वृत्तानुसार यापूर्वी केवळ ३० दिवसांपर्यंतचा जुना डेटा अँड्रॉईड युझर्स डाऊनलोड करु शकत होते. सोबतच तुम्ही कुणीतरी पाठवलेली मीडिया फाईल डिलीट केली तर ती सर्व्हरवरुनही गायब होत असे. पण व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेल्या फाईल्सही उपलब्ध असतील. फाईल्स सर्व्हरवर ठेवल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे काळजी घेतली जाणार आहे. कारण, पूर्ण फाईल्स या एंड टू एंट एनक्रिप्टेड असतील.

Leave a Comment