नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञांनी देशातच नव्हे तर जगामध्ये प्रथमच डेंग्यूवर प्रभावी औषध तयार केले असून या औषधाची पायलट स्टडीही रुग्णांवर यशस्वी ठरली. हे औषध आता बाजारात आणण्यापूर्वी ग्लोबल स्टँडर्ड अंतर्गत याची मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. डेंग्यूच्या सामान्य रुग्णांसाठी हे औषध २०१९पर्यंत बाजारात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे आयुर्वेदीक असलेले हे औषध सात औषधी रोपांपासून तयार करण्यात आले आहे.
भारतात तयार झाले डेंग्यूचे पूर्णपणे आयुर्वेदीक औषध
आयषु मंत्रालयाची संशोधन संस्था, रिसर्च इन आयुर्वेद (सीसीआरएएस) च्या तज्ज्ञांनी डेंग्यूच्या या औषधीचा शोध लावला आहे. अनेक तज्ज्ञांना हे औषध तयार करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ झटावे लागले. पायलट स्टडीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर आता सीसीआरएएस इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या मदतीने बलगाम आणि कोलार मेडिकल कॉलजमध्ये डेंग्यूच्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय चाचणी घेत आहे. ही चाचणी तीन पातळ्यांवर केली जाणार आहे. ही चाचणी सप्टेंबर-२०१९ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर निष्कर्षांचे विश्लेषण केले जाईल.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही