
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एअरटेल कंपनीला चपराक लगावली असून एक विशिष्ठ प्लॅन एअरटेलच्या ग्राहकांना घेतल्यामुळे आयपीएलचे सामने मोबाईलवर मोफत पाहता येतील, अशी जाहिरात करणे चुकीचे असल्याहा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
फसवी आहे एअरटेलची जाहिरात, उच्च न्यायालयाचा निर्णय
जिओने एअरटेलच्या या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यावर जिओच्या बाजूने निर्णय दिला असून आता एअरटेल त्यांच्या जाहिरातीत बदल करणार आहे.
क्रिकेट सीझन पॅकबाबत एअरटेलची दिशाभूल करणारी जाहिरात असून प्लॅन घेतल्यावर आयपीएलचे सामने मोफत पाहता येतील असे या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. पण पण डेटाचे पैसे भरावेच लागतील, हे जाहिरातीत सांगितले गेले नाही. जिओने ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
