गुगल असिस्टंटशी लग्न करण्यास ४.५ लाखांहून अधिकजण तयार


गुगल असिस्टंटचा आवाज अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनी कधी ना कधी ऐकलाच असेल. सध्या जगभरात गुगलची ही सुविधा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कोणतीही गोष्ट आपण बोललो की गुगलवर त्याबद्दलची सगळी माहिती एका महिलेच्या आवाजात आपल्याला मिळते. भारतीयांसाठी या महिलेचा आवाज अतिशय खास आहे. कारण भारतीयांना या महिलेचा आवाज खूप आवडतो असे नुकतेच समजले आहे. त्याचबरोबर एक दोन नव्हे तर तब्बल ४ लाख ५० हजार जण तर या महिलेशी लग्न करण्यासाठी तयार असल्याची माहिती गुगल प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष ऋषी चंद्रा यांनी दिली आहे.

आपल्याला शोधायची असलेली एखादी गोष्ट टाईप करण्यापेक्षा भारतीय लोक बोलून सर्च करणे जास्त पसंत करतात असे गुगलकडून सांगण्यात आल्यामुळे गुगलची स्पिकर सुविधा अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. गुगल होम आणि गुगल होम मिनी या दोन्हीमध्येही गुगल स्पिकरतर्फे व्हॉईस असिस्टंट सुविधा देण्यात येत आहे. ही सुविधा सध्या केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध असून येत्या काळात ती हिंदीमध्येही उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment