सिम असलेला लॅपटॉप सादर करणार रिलान्यस जिओ!


मुंबई : स्वस्त इंटरनेट सेवा आणि स्वस्त मोबाईल सेवा देऊन इतर टेलीकॉम कंपन्यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीने अजून एक धमाका केला आहे. सिमकार्ड असलेला लॅपटॉप आता कंपनी लॉन्च करणार आहे. आपला अॅव्हरेज रेव्हून्यूवर युजर वाढवण्याचा प्रयत्न कंपनी करत असून त्यासाठी हा सिम कार्ड असलेला लॅपटॉप फायदेशीर ठरेल. गेल्या वर्षी ४ जी फिचर फोन रिलायन्स जिओने लॉन्च केला होता. जिओ लॉन्च झाल्यानंतर तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सला ५०० कोटींचा नफा झाला.

अमेरिकेची मोठी चिप निर्माता कंपनी क्वालकॉमसोबत मुकेश अंबानीच्या नेतृत्वात जिओची बोलणे सुरु असून विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर हा लॅपटॉप चालेल आणि भारतीय बाजारात हा बिल्ट-इन सेल्युलर कनेक्शन सहित लॉन्च करण्यात येईल. जिओ आणि रिलायन्स रिटेलसोबत क्वालकॉम पहिल्यांदाच ४जी फीचर फोनसाठी काम करेल.

इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत क्वालकॉम टेक्नॉलॉजीजचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सिनियर डायरेक्टर Miguel Nunes ने सांगितले की, जिओसोबत आमची चर्चा सुरु असून त्यांचे डिव्हाईस घेऊन डेटा आणि कॉन्टेंटचा लाभ घेऊ शकता. याशिवाय चिपनिर्माता Internet of Things (IoT)ब्रॅंड स्मार्ट्रोनसोबत सेल्यूलर कनेक्टिव्हिटी असलेल्या स्नॅपड्रेगन ८३५ असलेल्या लॅपटॉप आणण्याचे बोलले जात आहे. या बातमीला स्मार्ट्रोनने देखील दुजोरा दिला आहे.

दिग्गज कंपन्या एचपी, आसुस आणि लेनोव्हा सारखे लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्या क्वालकॉम पहिल्या दुनियेत एकत्र येऊन काम करत आहेत. याशिवाय ही नवीन या तंत्रज्ञानाशी जोडण्यात रुची दुनियेच्या १४ मोठ्या ऑपरेटर्सने दाखवली आहे. यात वेरिजोन, AT&T आणि स्प्रिन्ट्स सारख्या कंपन्या सहभागी आहेत. याशिवाय जर्मनी, इटली, युके, फ्रॉन्स आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशातील ऑपरेटर्संना हे तंत्रज्ञान हवे आहे.

दरम्यान याबाबत जिओकडून याबद्दलची कोणतीही माहिती मिळालेली नाही. काऊंटरपॉईंट रिसर्च डिरेक्टर नील शहानुसार, सिम कार्ड असलेल्या लॅपटॉपच्या साहाय्याने ऑपरेटर्सला ARPU वाढवण्यासाठी मदत मिळेल. भारतात सुमारे पन्नास लाख लॅपटॉप प्रत्येक वर्षी विकले जातात. यातील अधिकतर लोक होम किंवा पब्लिक वायफायच्या माध्यमातून कनेक्ट केले आहे.

Leave a Comment